Ad will apear here
Next
गोव्यातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. बसवेश्वर चेणगे
डॉ. बसवेश्वर चेणगेसातारा : गोव्यातील ताळगाव येथील माधव राघव प्रकाशनच्या पुढाकाराने रविवारी, १२ मे २०१९ रोजी मिरामार (पणजी) येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मसूर (जि. सातारा) येथील गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांची निवड करण्यात आली आहे.

रविवारी मिरामार येथील यूथ हॉस्टेलमध्ये हे संमेलन आयोजित करण्यात आले असून, सकाळी १० वाजता या संमेलनाचे उद्घाटन पत्रकार व वक्ते प्रभाकर ढगे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 

दुपारच्या सत्रात प्रा. नीता तोरणे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. 

संमेलनाध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे हे पत्रकार, साहित्यिक, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत. गुंफण दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यासह इतर राज्यांतील मराठी भाषिकांचे साहित्य प्रसिद्ध होत असते. गुंफण अकादमीतर्फे मराठी भाषा, साहित्याच्या जतन, संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. गेल्या सोळा वर्षांपासून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात साहित्य संमेलन घेण्यात येते. या संमेलनात साहित्य पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात येतो. विनोदी कथास्पर्धा घेण्यात येते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZUNCA
Similar Posts
‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी एकजुटीने प्रयत्न व्हावेत’ सातारा : ‘मराठी भाषेला प्राचीन वारसा असून मराठीचे वैभव जपणे व संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळावी. यासाठी संपूर्ण देशभरात राहणाऱ्या मराठी भाषकांनी ध्यास घेऊन एकजुटीने प्रयत्न करायला हवेत,’ असे प्रतिपादन गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले
प्रेमलाताई चव्हाण विनोदी कथा स्पर्धेत सहभागाचे आवाहन सातारा : सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेसाठी आपल्या कथा पाठवण्याचे आवाहन अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले आहे.
डॉ. बसवेश्वर चेणगे यांना राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार सातारा : महाराष्ट्र मंडळ, दिल्ली मराठी मंडळ व पुढचे पाऊल संस्था या राजधानी नवी दिल्लीतील मराठी संस्थांच्या वतीने मराठी भाषा व मराठी साहित्य चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कराड तालुक्यातील मसूरचे सुपुत्र, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांचा राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला
‘चांगल्या आरोग्यासाठी चांगली जीवनशैली आवश्यक ’ मसूर : ‘आयुष्यभर गोळ्या खाऊन जगायचे व रिपोर्ट नॉर्मल ठेवायचे म्हणजे आरोग्य नव्हे. आपण आजारीच पडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे’,असा कानमंत्र ‘विश्वगण आयुर्वेद’चे आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण माने यांनी दिला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language